Wakad News : हातातील स्टीलच्या कड्याने तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – झाड तोडण्याचा कारणावरून झालेल्या भांडणात तीन जणांनी एका तरुणाला हातातील स्टीलच्या कड्याने बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास नढेनगर, काळेवाडी येथे घडली.

शिवाजी गणेश कोरे (वय 37, रा. नढेनगर, काळेवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश अनिल ननावरे (वय 23), आकाश महादेव पवार (वय 29), जयेश सुरेश दाभाडे (वय 28, सर्व रा. नढेनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपींनी झाड तोडले. या कारणावरून झालेल्या भांडणात आरोपी पवार आणि दाभाडे यांनी फिर्यादी शिवाजी कोरे यांना धरून ठेवले. तसेच आरोपी ऋषिकेश ननवरे याने त्याच्या हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादी कोरे यांच्या डोक्यात मागील बाजूला मारून जखमी केले. पोलीस हवालदार खुटवड तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.