Ganeshotasav 2023: सोशल मिडियाचा अतिवापर आणि दुष्परिणाम आधारित जिवंत देखाव्यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज – सामाजिक सलोखा आणि एकतेचे प्रतिक असलेला गणेशोत्सव यंदादेखील मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotasav 2023) तिसऱ्या दिवशी शहरातील अनेक गणेश मंडळांनी देशातील तरुणाई आणि सोशल मिडीयाचा अतिवापर आणि त्याचे दुष्परिणाम याविषयावर आधारीत जिवंत देखावे सादर केले. या जिवंत देखाव्यांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सामाजमाध्यमांच्या उपलब्धतेमुळे संवाद प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. त्यामुळे लोकांमध्ये संवाद प्रभावी व जलदगतीने होण्यास मदत झाली. लेखी, श्राव्य, दृकश्राव्य अशा विविध माध्यमातून प्रभावीपणे संवाद होण्यास चालना मिळाली. माहितीची देवाणघेवाण होण्यास मदत झाली. तसेच लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देखील उप्धलब्ध झाले.

Wakad : पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण; एकास अटक

सामाजमाध्यमांच्या वापराचे जसे फायदे आहेत तसेच त्याच्या अतिवापराचे तोटे देखील आहेत. समाजमाध्यमांमुळे लोकांचे अभासी जगामध्ये वावरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थेट संवादावर परिणाम झाला आहे. कुटुंबातील वैयक्तिक संवाद सामाज माध्यमांवर होतांना दिसत आहेत. समाजमाध्यमांच्या वापरामुळे लहान मुलांच्या वर्तनावर, शरीरावर दुष्परिणाम परिणाम होताना दिसत आहेत.

घरात असताना सोशल मिडियाच्या प्रमाणाबाहेर वापरामुळे पती-पत्नी, पिता-पुत्र, आई, वडील आणि मुले यांच्यातला संवाद कमी झाला आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लाऊन मोडतोड केलेला मजकूर प्रसारित करून चुकीची माहिती पसरविणे, सामाजिक कलह निर्माण करणे असे प्रकार देखील वाढताना दिसत आहेत.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून आर्थिक, मानसिक छळ व फसवणूक करणे असे प्रकार समाज माध्यमांच्या अति व चुकीच्या वापारामुळे वाढीस लागत आहे. मोबाईल आणि सोशल मिडीयाचा मर्यादित वापर केल्यास मानवी व सामाजिक स्वास्थ सुदृढ ठेवण्यास मदत होईल, असा संदेश या देखाव्यांच्या माध्यमातून देण्यात आला.

रहाटणी फाटा येथील जय म्हल्हार मित्र मंडळ आणि थेरगाव येथील सम्राट मित्र मंडळानी सोशल मिडियाचा अतिवापर आणि दुष्परिणाम या विषयावर आधारित जिवंत देखावा सादर केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.