Ganeshostav 2020: प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्ते दाते यांचे; एकदा प्राणप्रतिष्ठाना झाल्यानंतर गणेश मूर्ती हलवली तर चालते का?

Ganeshotsav 2020 your question the answer of panchang karte date; Does it work if the idol of Ganesha is moved once the pranapratishtana is done? अथर्वशीर्ष किमान एकदा, एकवीस वेळा किंवा एक हजारवेळा म्हणण्याची पद्धती आहे.

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात अनेक धार्मिक विधी केले जातात. त्याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नं असतात. भाविकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं खास ‘एमपीसी’च्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहेत. आजच्या भागात काही निवडक प्रश्नं पुढीलप्रमाणे…

1. गणेश स्थापने दिवशी फक्त एकदाच आरती करावी, का दोन्ही वेळी करावी ? (म्हणजे फक्त स्थापना झाल्यावर, की सकाळ संध्याकाळ)

– गणेशस्थापना केल्यावर विसर्जनापर्यंत रोज सकाळी व संध्याकाळी आरती करावी. स्थापनेच्या दिवशी सकाळी पूजा केली असली तरी संध्याकाळी आरती करावी.

2. या दहा दिवसांत अथर्वशीर्ष पठण कसे करावे ? किती आवर्तने करावीत?

– गणेशोत्सवाच्या काळात गणपती अथर्वशीर्ष सर्वत्र म्हटले जाते. ज्यांना अथर्वशीर्ष येत नसेल त्यांनी गणपतीचे कोणतेही इतर स्तोत्र म्हटले तरी चालते. अथर्वशीर्ष किमान एकदा, एकवीस वेळा किंवा एक हजारवेळा म्हणण्याची पद्धती आहे.

एकदाच म्हणणाऱ्यांनी सुरुवातीपासून फलश्रुती पर्यंत संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणावे. एकवीस किंवा एक हजारवेळा म्हणणाऱ्यांनी सुरुवातीचा भद्रं कर्णेभिः पासून शांतिः शांतिः पर्यंतचा शांतिपाठाचा भाग पहिल्या वेळेस म्हणावा नंतर नमस्ते गणपतये पासून श्रीवरदमूर्तये नमः पर्यंतच्या मंत्रांची आवर्तने करावीत व शेवटच्या आवर्तनाला फलश्रुतीचा भाग म्हणावा.

3. दररोजची पाद्य पूजा यासाठी काही ख़ास विधी आहे का ?

– गणेश स्थापनेच्या दिवशी षोडशोपचार पूजा केली जाते. त्यानंतर विसर्जनाच्या दिवसापर्यंत किमान पंचोपचार पूजा म्हणजे अथर्वशीर्ष किंवा येत असेल ते गणपतीचं स्तोत्र म्हणून अभिषेक, गंध, फूल, अक्षता, उदबत्ती, निरांजन लावणे व नैवेद्य आणि आरती एवढा विधी करता आल्यास अधिक चांगले.

4. प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्ती हलवू नये असं म्हणतात मग काही ठिकाणी ती हलवली जाते, (लक्ष्मी आल्यावर मध्ये ठेवली जाते) असं कसं?

– प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर मूर्ती हलवू नये हे बरोबर आहे. काही जणांकडे मूर्ती हलवून लक्ष्मीपाशी नेवून ठेवण्याची प्रथा आहे. पण तसे करणे योग्य नाही. प्राणप्रतिष्ठापना झालेली मूर्ती विसर्जनापर्यंत शक्यतो हलवू नये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.