Nigdi : आकुर्डीत टोळक्याचा राडा; दोन रिक्षांच्या काचा फोडल्या

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथे काही तरुणांसह अल्पवयीन मुलांनी राडा घातला. टोळक्याने दोन रिक्षांच्या काचा फोडल्या आहेत. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री काही जणांनी मिळून आकुर्डी येथे दोन रिक्षाच्या काचा फोडल्या. काचा फोडत असताना ही मुले ‘रावण-रावण’ असे ओरडत होती. आकुर्डी येथे तोडफोड केल्यानंतर या मुलांनी आपला मोर्चा ट्रान्सपोर्टनगरकडे वळवला. ट्रान्सपोर्ट नगर येथे मुलांनी एका ट्रक चालकाला अडवून लुटले. निगडी पोलिसांनी तोडफोड आणि लूटमार करणा-या काही मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या साथीदारांना पकडून करवीर करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.