Pune : पुणेकरांना पाणी द्या; नगरसेवकांचे अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 25 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा असतानाही पुणेकरांना पाणी मिळत नाही. अशा तक्रारी नगरसेवकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. फोन केला असता हे अधिकारी उचलत नसल्याचीही त्यांची संतप्त भावना आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात पाणी न दिल्याने भाजपचे 2 उमेदवार पराभूत झाले. शिवाजीनगर मतदारसंघातही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. पोलीस लाईनमध्ये रोज पाण्याच्या माझ्याकडे तक्रारी येतात. त्या भागात टँकरनेही पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सांगितले.

तर, धरण क्षेत्रात चांगला पाणीसाठा असल्याने पुणेकरांना पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तर, पेठांमध्ये रात्री – अपरात्री पाणी येत असल्याची ओरड होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.