Pimpri : जागतिक महिला दिनानिमित्त महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव

ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आणि इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या कार्याचा आलेख सर्वांसमोर मांडला जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 29) सकाळी साडेदहा वाजता मनोहर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे होणार आहे. ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आणि इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वीणा गोखले, रजनी परांजपे, वंदना चक्रबर्ती या तीन महिला रत्नांचा ज्ञानप्रबोधिनी निगडीचे केंद्रप्रमुख व शिक्षणतज्ज्ञ वा ना अभ्यंकर यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखक विश्वासराव मेहेंदळे सत्कारमूर्तींची मुलाखत घेणार आहेत.

वीणा गोखले यांनी आर्टिस्ट्री संस्थेच्या माध्यमातून देणे समाजाचे हा उपक्रम राबविला आहे. झोपडपट्टी व बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी रजनी परांजपे यांनी फिरत्या शाळेची यशस्वी संकल्पना मांडण्यात आली आहे. या फिरत्या शाळेत सध्या अनेक विद्यार्थी हसत खेळत शिक्षण घेत आहेत. या उपक्रमामुळे शाळाबाह्य मुले शाळेच्या प्रवाहात आणली जात आहेत. मुलांमधील साक्षरता वाढविण्यासाठी हा उपक्रम खूप मोठे योगदान देत आहे. एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी प्रकुलगुरू वंदना चक्रबर्ती यांनी प्रौढ शिक्षा अभियान, समाजाभिमुख अभ्यासक्रमांचे नियोजन याबाबत उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कामाबद्दल प्रेरणादायी कृतज्ञता सोहळा साजरा करण्यासाठी हा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मनोज देवळेकर, प्रतिभा जोशी दलाल, रेखा मित्रगोत्री, राजश्री ओझर्डे यांनी केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like