Pimple Guruv : दिलासा संस्थेच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वच्छता सेविकेचा सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिलासा संस्थेच्या ( Pimple Guruv ) वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता सेविका सुनिता दिगंबर मुन्ने या महिलेचा आज (शुक्रवारी)  पिंपळे गुरव येथे सन्मान शाल आणि रोख रक्कम देऊन दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केला.

Chinchwad : शिवशंभो व्याख्यानमालेच्या अंतिम पुष्पात अभिवाचनाच्या आविष्काराने श्रोते मंत्रमुग्ध

कचऱ्याची गाडी रोज शहरातील कचरा गोळा करीत फिरते. आपले शहर या कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांमुळे खऱ्या अर्थाने स्वच्छ राहात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुनिता मुन्ने या महिला कामगार ओला आणि सुका कचरा विलग करून आमच्याकडे द्या असे हसतमुख होऊन सांगत  नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत.

कचऱ्याच्या गाडीत त्या ढिगावर बसून अन् तोंडाला मास्क लावून काम ( Pimple Guruv ) करतात. त्यांचा जागतिक महिला दिनी सन्मान करताना विशेष आनंद होत आहे असे कंक यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.