Vadgaon Maval News : कुडे परिवाराकडून आमदार सुनील शेळके यांना ‘गोदान’

एमपीसी न्यूज – अतिथी देवो भव! ही भारतीय संस्कृती आहे. आलेल्या अतिथीला देवाच्या स्वरूपात पाहणे ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली वेगळी दृष्टी आहे. मान्यवर घरी आल्यानंतर त्यांचे स्वागत करावे, त्यांची आदराने विचारपूस करावी आणि त्यांना भरल्या हाताने निरोप देणे; ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीला स्मरून वडगाव मावळ येथील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करणा-या कुडे परिवाराने आमदार सुनील शेळके यांना भेट म्हणून गाय दिली म्हणजेच गोदान केले. प्रीतीभोजनासाठी आमदार सुनील शेळके घरी आल्यानंतर वडगाव शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेंद्र कुडे आणि त्यांच्या परिवाराकडून ही भेट देऊन विशेष सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त तुकाराम ढोरे,माजी सरपंच विशाल वहिले,युवा नेते अनिल मालपोटे, वडगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रवीण ढोरे, पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, तालुका ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, अल्पसंख्याक सेल माजी अध्यक्ष आफताब सय्यद,युवा नेते शरद ढोरे व कुडे परिवार उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके हे शुक्रवार (दि 8) वडगाव येथे कुडे परिवाराकडे स्नेहभोजनासाठी आले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व वडगाव नगरपंचायतचे नगरसेवक राजेंद्र कुडे, ज्येष्ठ कार्यकर्ते देवराम कुडे, शांताराम कुडे, सुरेश कुडे, मारूती कुडे, प्रकाश कुडे आणि कुडे परिवारातील सदस्यांकडून आमदार शेळके यांचा श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ व ” गोदान ” करून विशेष सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.