Dighi Crime News : गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – विक्री करण्यासाठी गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. चर्होली बु. वाघेश्वरवाडी येथे शनिवारी (दि.09) अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

रोहिदास बाबु ठोंबरे (वय 37, रा. चर्होली बु. वाघेश्वरवाडी, दिघी) असे अटक आरोपीचे नाव आहे. दिघी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगला होता. त्याच्याकडे 15 हजार 200 रूपये किंमतीचा 608 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. आरोपीला अटक केली असून, दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.