Chakan : गोडाऊनचे पत्रे उचकटून सव्वालाखांच्या कॉपर वायर चोरीला

एमपीसी न्यूज – गोडाऊनचे मागील बाजूचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमधून एक लाख 37 हजार 713 रुपये किमतीच्या कॉपर वायर चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी साडेपाचच्या सुमारास गायकवाड वस्ती कुरुळी येथे उघडकीस आली.

दीपक आनंदराव महाराणा (वय 40, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक यांचे कुरुळीमधील गायकवाड वस्ती येथे लॅंप इंडिया प्रा. लि. कंपनीचे गोडाऊन आहे. दीपक यांनी रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोडाऊन कुलूप लावून बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या मागील बाजूचे पत्रे कापून गोडाऊनमध्ये प्रवेश केला. गोडाऊनमधून 1 लाख 37 हजार 713 रुपये किमतीच्या कॉपर वायर चोरून नेल्या. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.