Bhosari : मोपेड दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीवरून जात असताना अचानक दुचाकी स्लिप झाली. यामध्ये दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला दुसरा तरुण जखमी झाला आहे. ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे घडली.

कुंदनकुमार वकील राय (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, मोशी. मूळ रा. सब्बालपूर हस्ती टोला, ता. सोनपूर, जि. छप्परा, बिहार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर दीपक अजय कंधारे (वय 20) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कुंदनकुमार आणि दीपक हे दोघेजण 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मोपेड दुचाकीवरून भोसरी येथे पैसे आणण्यासाठी आले. पैसे घेऊन ते परत मोशीकडे जात होते. पांजरपोळ येथे आले असता कुंदनकुमार यांची दुचाकी दगडावरून स्लिप झाली. यामध्ये कुंदनकुमार याच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 25 नोव्हेंबर रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला दीपक याला दुखापत झाली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.