Gold-Silver Rate today in Pune : 2 दिवसांच्या घसरणीनंतर पुण्यात सोन्याचे भाव वधारले

एमपीसी न्यूज : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव रोज बदलतात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी ताजा भाव माहिती असणे आवश्यक आहे. शहरातील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. येथील दुकानांमध्ये दागिन्यांचे निरनिराळे ऑप्शन मिळतात. (Gold-Silver Rate today in Pune) त्यामुळे ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.गुढीपाडवा आणि रामनवमी या सणाच्या कालावधीमध्ये पुण्यातील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. पुण्यात सोन्या-चांदीच्या दरात रोज चढ-उतार सुरूच असतो. सोमवारी सोन्याच्या दरात घट झालेली पहायला मिळाली.तर  2 दिवसांच्या घसरणीनंतर पुण्यात सोनं महागल्याचं दिसत आहे.

Pimpri : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक अनोखा उपक्रम

पुण्यात काल (3 एप्रिल) ) 24 कॅरेट सोन्याचा दर 61,100 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 55784 रुपये प्रती तोळा इतका होता.पुण्यात आज (4 एप्रिल) ) 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹61,200 एवढा असून काल पासून ₹100 नी महाग झाले आहे.काल हाच भाव ₹61,100 एवढा होता. आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹59,600 एवढा असून काल पेक्षा ₹370 नी वाढले आहे. काल हाच भाव ₹59,230 एवढा होता. सोमवारपेक्षा हा दर वाढला आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव   56,900 एवढा असून काल पेक्षा ₹350 नी महाग झाल्याचे दिसून काल 22 कॅरेट सोन्याचा भाव₹56,550 एवढा होता.  तर चांदी चा भाव मात्र तब्बल ₹2000 नी वाढला असून आज 1 किलो चांदी चा भाव ₹76,000 एवढा आहे. मागील  काही दिवस चांदी चा भाव 1 किलो ला ₹74,000 एवढा होता.

पुणे शहरातील हे सोन्याचे सर्वसाधारण दर आहेत. (Gold-Silver Rate today in Pune) या किंमतीमध्ये जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि अन्य कारणांमुळे बदल होऊ शकतो.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.