Pimpri : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज – बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारांचा आदर्श घेत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हार फुले अर्पण करण्यापेक्षा वही,पेन व शैक्षणिक साहित्य अर्पण करून वैचारिक अभिवादन (Pimpri) करावे असे आवाहन करण्यात येते.हे अभियान दरवर्षी राबवले जाते. यावर्षी देखील संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भिमसृष्टी स्मारक,पिंपरी येथे दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9:00 पासून हे अभियान दिवसभर राबवण्यात येणार आहे.

Pune : अरविंद सावंत यांच्या विरोधात पुण्यात जोडो मारो आंदोलन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात अधिक शिक्षणाला महत्व दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका-संघटित व्हा व संघर्ष करा असा मुलमंत्र दिला. (Pimpri) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व आंबेडकरी अनुयायांना आवाहन करण्यात येते की आपण जयंतीदिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येताना हार फुले न आणता वही,पेन,शैक्षणिक साहित्य अर्पण करून वैचारिक अभिवादन करावे. या अभियाना अंतर्गत जमा झालेले शैक्षणिक साहित्य महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.