Pune : सोने तस्करी करणा-या महिलेला अटक; अर्धा किलो सोने जप्त

एमपीसी न्यूज – पुणे विमानतळावर कस्टम अधिका-यांनी एका महिला प्रवाशाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिच्याकडे तब्बल 541.48 ग्रॅम वजनाचे सोने आढळले. तसेच गुडंग गरम सिगारेटचे दोन बॉक्स आढळून आले. पोलिसांनी तिच्याकडून तब्बल 16 लाख 48 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई आज (रविवारी) पुणे विमानतळावर करण्यात आली.

सोने तस्कर करणारी महिला आज पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी वर्षा नावाच्या महिलेला ताब्यात घेतले. तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे पांढऱ्या रंगाने झाकलेले दोन अँकलेट, एक सोन्याची साखळी, जीन्स पॅन्टमध्ये लपवलेली तीन सोन्याची बटणे असा 16 लाख 38 हजार 518 रुपयांचा ऐवज सापडला. तसेच 10 हजार रुपये किमतीचे गुडंग गरम सिगारेटचे दोन बॉक्स मिळाले. पोलिसांनी एकूण 16 लाख 48 हजार 518 रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. याबाबत महिलेकडे चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिला अटक करण्यात आली असून तिच्यावर कस्टम्स अॅक्ट 1962 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.