Goregaon Fire : मुंबईतील गोरेगाव येथे अग्नितांडव; आगीने घेतले रौद्ररूप

एमपीसी न्यूज : मुंबईतील गोरेगाव येथून (Goregaon Fire) मोठी घटना समोर आली आहे. गोरेगाव मधील राम मंदिर रोड येथे काही दुकानांना मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की गोरेगावमधील भडेकर कंपाऊंड 90 फूट रोड येथील एका फर्निचरच्या गोदामाला आग लागली. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Rahatni: गॅस चोरी प्रकरणी एकास अटक

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या किमान आठ गाड्या, रुग्णवाहिकेसह (Goregaon Fire) घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाचे कार्य अद्याप सुरू आहे.  फर्निचरचे दुकान असल्याने दुकानांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.