OBC Reservation : ओबीसी विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; कायद्याचा मार्ग मोकळा

एमपीसी न्यूज – ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र विधिमंडळात विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यास नकार दिला होता. महाराष्ट्रात जिल्हा परिषद, महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाने ओबीसी आरक्षणासाठी स्वतंत्र विधेयक तयार केले. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर शुक्रवारी (दि. 11) स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे गेल्या आहेत.

या विधेयकामुळे निवडणूक प्रक्रियेचे अधिकार राज्य सरकारकडे येणार आहेत. राज्य सरकारने मांडलेल्या या विधेयकाला विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजुरी मिळाली आहे.

या विधेयकामुळे आगामी निवडणुकांमध्ये प्रभाग रचना, वॉर्ड रचना, मतदार याद्या बनवणे आणि निवडणूक कार्यक्रम, त्याच्या तारखा हे सगळे अधिकार राज्य सरकारकडे आले आहेत. निवडणूक आयोगाच्या सहमतीने आता निवडणूक तारखा ठरणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.