Hadapsar : केशवनगरमध्ये तीन मजली घराला लागली आग

एमपीसी न्यूज : केशवनगर येथील (Hadapsar) एका घरामध्ये सोमवारी आग लागण्याची घटना घडली. याबाबत माहिती देताना, स्टेशन ड्युटी ऑफिसर (हडपसर अग्निशमन केंद्र, पुणे महानगरपालिका) सोनावणे यांनी सांगितले, की ”सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास एका तीन मजली घराला आग लागली. आग पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघरात लागली होती. आगीमुळे स्वयंपाकघरातील फ्रिज, ओव्हण व इतर फर्निचर जळून खाक झाले आहे. रेफ्रिजरेटरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी.

Navale Bridge : जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलविण्यात यावी – सुप्रिया सुळे

हडपसर अग्निशमन केंद्रांचे प्रत्येकी एक अग्निशमन बंब घटनास्थळी (Hadapsar) आग विझवण्यासाठी पोहचले होते. अर्ध्या तासामध्ये आग विझवण्यात आली होती. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी स्वयंपाक घरातील दोन गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.