PMC : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2 हजार 658 सदनिकांचे बांधकाम पूर्ण

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजना (PMC) घटक क्र.3 अंतर्गत पुणे महानगरपालिकेतर्फे हडपसर, वडगाव(खु), खराडी येथे HDH/EWS आरक्षित जागेवर एकूण 5 प्रकल्पांमध्ये 2658 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या 5 प्रकल्पांसाठी लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन सोडत पद्धतीने व त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने करण्यात आली होती.

Pune: आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शहराच्या विकासाला आणखीन गती देणारा – हेमंत रासने 

Intelligent Works Management System:

पुणे मनपामध्ये वापरात असलेले Intelligent Works Management System अद्ययावत करण्यात आली आहे. ही सदर संगणक प्रणाली भविष्यात SAP System द्वारे लेखाविभागाशी जोडण्यात येणार आहे. (PMC)

अनधिकृत बांधकामावरील कारवाई :

पक्क्या स्वरूपाचे बहुमजली अनाधिकृत बांधकामावर हायड्रॉलिक डीमॉलीशन मशीनने (जॉ-कटर) सुमारे 3,62,527 चौ.फुट इतके अनधिकृत बांधकामावरील कारवाई करण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.