Loksabha Election 2024 : निवडणूक खर्चाच्या दर निश्चितीबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवार निवडणूक (Loksabha Election 2024)खर्चाची दरसूची निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च समन्वयक अधिकारी सोनाप्पा यमगर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, उप जिल्हा निवडणूक (Loksabha Election 2024)अधिकारी मीनल कळसकर, समिती सदस्य आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवान्यासाठी एक खिडकी सुविधा

निवडणूक प्रचारादरम्यान विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाच्या दराबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी काही सूचना केल्या. या सूचनांच्या अनुषंगाने याबाबत गठीत केलेल्या समितीत चर्चा करून दर अंतिम करण्यात येतील, असे निवडणूक खर्च समन्वयक अधिकारी यमगर यांनी सांगितले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.