Hadapsar: देशी दारूच्या विरोधात महिला आक्रमक

एमपीसी न्यूज – काळे बोराटेनगर येथील स. नं. ३८ प्रफुल्ल काॅलनी येथील “सरकार मान्य देशी दारू दुकान “ विरोधात या परिसरातील महिला भगिनी, नगरसेवक योगेश ससाणे यांच्या नेतृत्वाखाली एकवटून दुकान बंद झालेच पाहीजे, या मागणीसाठी हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्याकडे मागणी केली आहे.

या दुकानामुळे परिसरांत दारुडे व महिलांचे रोज वाद होत असून, संध्याकाळी ६ नंतर या परिसरातून महिला व मुलींना दुकाना समोरून जायची सोय राहिली नाही. रोज प्रचंड त्रास सहन करायला लागत असल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

सुमारे दोनशेहून जास्त महिला या मिटींगला उपस्थित होत्या. या प्रसंगी रघुनाथ जाधव यांनी महिलांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सर्व महिला योगेश ससाणे यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज घेऊन जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.