Maval : बाळा भेगडे यांच्याकडून कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा व फराळ

एमपीसी न्यूज – दिवाळी पाडव्यानिमित्त माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना दीपावली शुभेच्छा व दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते.

यावेळी अनेक मान्यवरांसह तालुक्यातील सर्व विभागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव झाल्याने मावळतील कार्यकर्ते, नातेवाईक व इतर निराश व हताश झालेले होते. मात्र, नामदार भेगडे यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्याने उभारी धरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि युतीचे घटक पक्ष तसेच सर्व मित्र परिवार यांना विशेष निमंत्रण देऊन आपल्या निवासस्थानी दिवाळी फराळ आणि शुभेच्छा देण्याचे आयोजन दिवाळी पाडव्यास केले होते.

सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री राम शिंदे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, जिल्हा किसान संघाचे अध्यक्ष शंकरराव शेलार, मावळ तालुका किसान संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, तळेगाव शहर भाजप अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, कार्याध्यक्ष दिनेश कोतुळकर,देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, युवा अध्यक्ष बंटी भेगडे, कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, माजी संचालक संभाजी पवार, कान्हेवाडी ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच नवनाथ उर्फ भाऊसाहेब पवार सह मावळचे सभापती, उपसभापती, पक्षाचे आजी- माजी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.