Talegaon : वराळे येथील डीवाय पाटील शाळेत हरित दिवस उत्साहात

एमपीसी न्यूज – हरित दिवसनिमित्त वराळे येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल आँफ एक्सलन्स आणि कॉलेज आँफ सायन्स येथे  हरित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

हरित दिवसाचे औचित्य साधून वराळे येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आणि शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रदूषण विरहीत व प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबतचे अतिशय प्रभावी आणि विलोभनीय प्रदर्शन सादर करण्यात आले. अकरावीतील विद्यार्थ्यांनी जागृत व सतर्क संदेश देण्यात आला. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज आँफ इंजिनियरींग अँड ईनोव्हेशनचे  प्राचार्य  डाँ. सुनिल इंगोले  यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी ईको सिटी (Eco City) येथील रहिवाश्यांना हरित दिनाच्या शुभेच्छा देऊन प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या भेट देऊन निसर्गाचे प्रदूषण विरहीत रूप दर्शविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.