Pimpri : कोरोना विषाणूच्या तक्रारी किंवा माहितीसाठी डायल करा… 020-26127394

राज्य सरकारने केला हेल्पलाइन नंबर जाहीर

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूबाबत खबरदारी घेतली जात असून राज्य सरकारने आज (गुरुवारी) 020-26127394 हा हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. कोरोनाबाबतची तक्रार, माहिती या नंबरवर दूरध्वनी करून घेता येणार आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या ‘कोरोना’ विषाणूने जगभरात भीतीचे थैमान घातले आहे. भारतात देखील ‘कोरोना विषाणू’ हळूहळू पसरत असून महाराष्ट्रात देखील शिरकाव करु लागला आहे. कोरोनापासून दक्षता घेण्यासाठी राज्य सरकार दक्ष आहे. विविध उपाययोजना घेतल्या आहेत. कोरोनासाठी विषाणूबाबतच्या तक्रारी किंवा माहितीसाठी राज्य सरकारने हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. 020-26127394 हा हेल्पलाइन नंबर आहे.

करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे होळीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करु नका. अनावश्यक ठिकाणी गर्दी करु नका. गरज नसेल तर, गर्दी टाळा असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सरकार दक्ष आहे. पुढचे 10 ते 15 दिवस काळजी घेण्याची गरज आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही. नागरिकांना मास्क वापरण्याची गरज नाही, असेही ठाकरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.