Pune – हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; पीडितेची सुटका तर दोघांना अटक

एमपीसी न्युज –  पैशांचे आमिष दाखवून तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेणा-या दोघांना अटक करून  हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई कात्रज येथील सुखसागर नगरमधील समृद्धी बंगल्यात आज गुरूवारी (दि.27) करण्यात आली.

मानसी जितेंद्र मगीया (वय 23, रा. कात्रज) व विश्वराज ऊर्फ कृष्णा सर्जेराव विधाते(वय 28, रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशांचे आमिष दाखवून विश्वराज आणि मानसी हे दोघे तरूण मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत व गि-हाईक पाठवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून समृद्धी बंगल्यावर छापा टाकून पीडित तरुणीची सुटका केली व तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिला एजंट मानसी आणि विश्वराज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून 2 हजार 500 रुपयांची रोकड आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले. या गुन्ह्यातील पीडित तरुणीला हडपसर येथे संरक्षण कामी ठेवण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता खेडेकर, पोलीस उपनिरीक्षक अनंता व्यवहारे, पोलीस कर्मचारी नितीन तरटे, नामदेव शेलार, गीतांजली जाधव, सुनिल नाईक, नरुटे, ननिता येथे, शेवाळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.