Chakan : सिद्धार्थ गोतारणे यांचे निधन

एमपीसी न्यूज – खेड तालुका भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष सिद्धार्थ उर्फ बाप्पू मधुकर गोतारणे (वय ४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक संस्था व संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिणी, भाऊ,चुलते असा मोठा परिवार आहे. चाकण शहर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गोतारणे यांचे ते चुलत बंधू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.