Hinjawadi : बालविवाह प्रकरणी आई-वडिलांसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह (Hinjawadi) लावून दिला. त्यानंतर पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने मुलगी गरोदर राहिली. याबाबत पिडीत मुलीच्या आई-वडिलांसह, सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय पिडीत मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आई, वडील, सासू, सासरे, पती, नणंद, नंदावा आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : दुसऱ्या कंपन्याच्या बाटल्यांना लेबल लाऊन पाणी विकल्या प्रकरणी एकावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी (Hinjawadi) पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना तिचा विवाह लावून दिला. त्यानंतर पतीने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने ती गरोदर रहिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.