Aundh : मुहूर्तावर लग्न लावा अन रोख मिळवा 25 हजार 555 रुपये; सनीज वर्ल्ड मंगल कार्यालयाची अनोखी योजना

एमपीसी न्यूज – लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या वेळेचे महत्व निमंत्रितांना जाणले पाहिजे. वेळात वेळ काढून, लांबचा प्रवास करून आलेल्या आप्तेष्टांना वेळेत सोहळा उरकून त्यांच्या पुढच्या कार्यासाठी पाठवणे ही मोठी जबाबदारी निमंत्रकांची असते. (Aundh) मात्र तासंतास डीजेच्या तालावर नाचणे, सत्कार, भाषणे अशा अनेक कारणांमुळे लग्नाचा मुहूर्त साधला जात नाही. त्यामुळे वेळेत लग्न लावणे हल्ली अत्यंत गरजेचे बनले आहे.

सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. दररोज नातेवाईक, मित्र परिवारात कुठे ना कुठे तरी लग्न समारंभ असतोच. अलीकडे बहुतांश लग्न संध्याकाळची असतात. साधारणपणे सहा ते सातच्या दरम्यान या लग्नांचा मुहूर्त असतो. पण तो सहसा पाळला जात नाही. त्यामुळे लग्न लागण्यास आठ ते साडेआठ वाजतात. मुहूर्ताची वेळ पाळली नाही तर सगळ्यांच्याच वेळेचे गणित बिघडते. आलेल्या पाहुणे मंडळींना इतर ठिकाणी लग्नास किंवा पुर्वनियोजित कार्यक्रमाला जायचे असेल तर ते नियोजन कोलमडून जाते. मंगल कार्यालयांमध्ये दररोज लग्न समारंभ असतात. त्यामुळे आदल्या दिवशीचा सोहळा लांबला तर त्याचा दुसऱ्या दिवशीच्या सोहळ्यावर निश्चितपणे परिणाम पडतो.

Nigdi : ‘समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देऊ नका’

कुटुंबसंस्थेवर आपली समाजरचना आहे. भारतीय संस्कृतीत विवाहाला अनन्यसाधारण महत्व आहे. काळाच्या ओघात ‘संस्कार ते समारंभ’ अशी लग्नाची संकल्पना बदलत गेली.(Aundh) लग्नात मुहूर्ताला महत्व आहे. लग्न मुहूर्त असला तरच तो दिवस लग्नासाठी ठरवला जातो. मग सगळ्या बाबी त्याभोवती जुळवून आणल्या जातात. परंतु दुर्दैवाने अनेक लग्नात मुहूर्ताची वेळच पाळली जात नाही. मुहूर्तावर लग्न लावण्याचे धार्मिक महत्व देखील सांगितले जाते.

वेळेत लग्न लावणाऱ्यांसाठी अनोळखी योजना

माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे सुस रोडवर ‘सनिज वर्ल्ड’ नावाचे मंगल कार्यालय आहे. सनी निम्हण यांनी त्यांच्या कार्यालयात लागणाऱ्या लग्नांमध्ये जे लग्न ठरलेल्या मुहूर्तावर लागेल त्यांना रोख 25 हजार 555 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे बक्षीस ठेवून देखील अद्याप हे बक्षीस कोणीही मिळवलेले नाही.

म्हणून हुकतो लग्नाचा मुहूर्त

लग्नाची वेळ पाळली न जाण्याची काही कारणं आहेत. ‘कार्य आहे घरचं होऊ दे खर्च’ अशा प्रकारची मानसिकता हल्ली निर्माण झाली आहे. त्यातूनच लग्नाचा भव्य दिव्य समारंभ केला जातो. (Aundh) त्यात डीजेच्या तालावर तासनतास वराती रंगतात. जावई भेट समारंभ, लग्नातील सत्कार, भाषणे यामुळे मुहूर्ताची वेळ लांबत जाते. उत्साहाच्या भरात आपल्या ते लक्षातच येत नाही.

मुहूर्ताची वेळ ठरवून आणि जाणीवपूर्वक साधली पाहिजे.

सनी निम्हण याबाबत सांगतात की, सनीज वर्ल्ड हे पुण्यातील एक मानांकित डेस्टिनेशन वेडिंग सेंटर आहे. इथे अनेक छोटे मोठे विवाह आयोजित केले जातात. हा माझा व्यवसाय असला तरी सगळे सोहळे आणि संस्कार व्यवस्थित पार पाडून आपण लग्नाची वेळ पाळू शकतो असा मला विश्वास आहे. लॉकडाऊनच्या काळात झालेले विवाह चांगले होते. सोहळा मर्यादित असायचा त्यामुळे वेळ पाळली जात होती, असे अनेकदा वाटते. मुहूर्ताची वेळ जाणीवपूर्वक साधण्यासाठी आम्ही बक्षिसाची योजना सुरु केली आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.