Nigdi : ‘समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देऊ नका’

एमपीसी न्यूज – समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता देऊ नये (Nigdi)यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले.  हे निवेदन पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी स्वीकारले.

यावेळी भास्कर रिकामे यांनी समलैंगिक विवाहास कायदेशीर परवानगी दिली. तर, भविष्यात अनेक अडचणी निर्माण होतील असे सांगून  निवेदनाची पार्श्वभूमी सांगीतली. मंडळाच्या वतीने अध्यक्ष विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, कार्यकारिणी सदस्य रविकांत कळंबकर, भास्कर रिकामे, वैदेही पटवर्धन, अश्विनी अनंतपुरे यांनी हे निवेदन दिले.

Bhosari : बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पाटली चोरीला

समलैंगिक विवाह या सामाजिक समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन (Nigdi) अत्यंत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते विजय सातपुते, मनेश म्हस्के, सुजित गोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.