Hinjawadi : कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गाय व कालवडची सुटका, एकाला अटक

एमपीसी न्यूज- टेम्पोमधून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाय व कालवड यांची सुटका (Hinjawadi) करण्यात आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी मुळशी येथे करण्यात आली  आहे.

दशरथ रामू कोरवी (वय 41 ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून निसार शब्बीर शेख (वय 34 रा.गंजपेठ, पुणे) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

Bhosari : बांधकाम साइटवर बळजबरी घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड टेम्पो एम एच 14 एच यू 81 81 या टेम्पो मधून देशी जातीचे व खिलारी जातीची गाय व कालवड यांना दाटीवाटीने घेऊन जात होता. दरम्यान त्याने त्यांना चारा किंवा अन्न पाणी यांची सुद्धा सुविधा केलेली नव्हती.

पोलिसांना खबर मिळतात पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेत त्यातून दोन लाख 62 हजार रुपयांच्या गाई व कालवड यांची सुटका केली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता ही जनावरे कत्तलीसाठी कोंढवा येथे नेण्यात येत होती.

यावरून हिंजवडी पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस याचा अधिक तपास करत (Hinjawadi) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.