Hinjawadi : तरुणीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीला वारंवार फोन करून तसेच पाठलाग करून एक तरुण त्रास द्यायचा. तरुणीचे लग्न जमल्यानंतरही त्याने तरुणीचा पिच्छा सोडला नाही. त्यामुळे वैतागलेल्या तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. ही घटना 2018 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत घडली.
दिवांकर कुमार शशिकांत गुप्ता (रा. जगतपुरा, जयपूर, राजस्थान. मूळ रा. मुसहरटोली, मुझफ्फरपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिवांकर हा फिर्यादी तरुणीचा मित्र आहे. त्याने त्याच्या मोबाईल फोनवरून तरुणीला वारंवार फोन करून पाठलाग केला. तसेच तिच्याशी संबंध ठेवण्याची धमकी दिली. 30 जून रोजी तरुणीचे लग्न जमले. त्यानंतर देखील तरुणाने तरुणीला वारंवार फोन करून तिच्याशी संबंध ठेवण्याची मागणी केली.
तसेच लग्नानंतर देखील संबंध ठेवावे लागतील, अन्यथा मारून टाकण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.