Hinjawadi Crime: कोट्यवधींची कर्जं देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या बोगस कंपनीचालकांना अटक

एमपीसी न्यूज: 1 कोटी ते 100 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या बोगस कंपनी चालकांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. (Hinjewadi News) अशी माहिती आनंद भोईटे, उप आयुक्त, परिमंडळ-2, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी आज हिंजवडी पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

 

 

याप्रकरणी एक महिला, संदिप समुद्रे, वय 37 वर्षे, रा. कालटण पूर्व ठाणे, जयजित गुप्ता, वय 36, डोंबिवली पश्चिम, कल्याण या तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.(Hinjewadi Crime) याबाबत श्रीराम पिंगळे, वय 43 वर्षे, रा कोथरूड यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे मित्र जयेश पाटील यास फेसबुकवर आलेल्या जलाराम इंटरप्राइजेस प्रा.लि फंड यांच्या व्यवसायासाठी एक कोटीच्या कर्जाच्या जाहिरातीवरून त्यांच्याशी संपर्क साधला. त्या कपंनीच्या एका महिलेने त्यांना बाणेर येथे बोलावून घेतले. फिर्यादी व त्याचे मित्र तेथे गेले व लोन बाबत चौकशी केली. 1 कोटी साठी 5 लाख रुपये कॅश(रोख) याप्रमाणे सेक्युरिटी डिपॉजिट द्यावे लागेल असे सांगून 45 दिवसात लोन दिले जाईल, अशी माहिती तेथील महिला मॅनेजर राधिका आंबेकर, रा. कल्याण पश्चिम हिने सांगितले.

Maval News: मावळ तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल उपाध्यक्षपदी प्रशांत ओव्हाळ

 

त्यावेळी फिर्यादी यांना ही कंपनी फसवणूक करण्याची शक्यता असल्याचा संशय आल्याने त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात येऊन ही माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन त्या कंपनीला गिर्‍हाईक म्हणून फोन केला असता सदर माहिती अपूर्ण व विश्वासपात्र नसल्याचे समजल्याने फिर्यादीची तक्रार घेऊन भा. द. वि कलम 420, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे व त्यांच्या पथकाने बाणेर येथे जाऊन महिला मॅनेजरची विचारपूस केली. (Hinjewadi Crime) तिच्याकडे कंपनीचे रेजिस्ट्रेशन नसल्याचे व कंपनीने आर बी आय च्या गाईडलाईन प्रमाणे परवानगी नोंदणी नसल्याची खात्री झाली. तसेच त्या ठिकाणी 7 महिला यांना अपॉइंटमेंट लेटर न देता नोकरीस ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तेथे छापा टाकून कारवाई करण्यात आली. 13 कॉम्पुटर, 7 मोबाईल, दोन कर्ज प्रकरण संबंधी कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच महिला मॅनेजर राधिका आंबेकर यांना मुंबई येथून 23 जुलैला संध्याकाळी 6.15 वा अटक केली.

 

 

 

तिच्याकडे केलेल्या तपासात तिचा साथीदार संदीप समुद्रे ही कंपनी चालवीत होता व प्रो प्रा म्हणून जयजित गुप्ता याचे नाव असल्याने त्या दोघांना 24 जुलै ला रात्री  11.50 वा अटक करण्यात आली. (Hinjewadi Crime)या दोघांनी ठाणे व नवी मुंबई वाशी सेक्टर 30 येथे यापूर्वी कंपनीची शाखा सुरु करून तेथेही बऱ्याच लोकांची फसवणूक केली असल्याची माहिती मिळाली. तसं तेथील पोलिसांनाही कळवण्यात आले आहे. हिंजवडी पोलिसांनी या आरोपींवर वेळीच कारवाई करून संभाव्य फसवणूकीचा गुन्हा घडवण्याचा डाव उधळून लावला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.