Hinjawadi Crime News : बँकेतून बोलत असल्याचे सांगून एकाची एक लाख 33 हजारांची ऑनलाइन फसवणूक

हा प्रकार 18 डिसेंबर 2019 रोजी न्युओलॉजी कंपनी, बाणेर येथे घडला.

एमपीसी न्यूज – आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डचे रीव्हर्ट झालेले पॉइंट परत मिळवून देण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने एकाची एक लाख 33 हजार 200 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार 18 डिसेंबर 2019 रोजी न्युओलॉजी कंपनी, बाणेर येथे घडला असून याबाबत 7 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुबोध प्रकाश कोठडिया (वय 49, रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 6391270936 या मोबईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 डिसेंबर 2019 रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने 6391270936 या क्रमांकावरून कोठडिया यांना फोन केला.

आपण आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट, पे बँक विभागातून मुंबई येथून बोलत असल्याचे आरोपीने कोठडिया यांना सागितले.

कोठडिया यांचा विश्वास संपादन करून तुमचे एक्सपायर झालेले क्रेडीट कार्डचे पॉइंट रीव्हर्ट करून देतो, असे आमिष दाखवले.

कोठडिया यांच्या मोबईलवर आलेला ओटीपी शेअर करण्यास भाग पाडले. ओटीपी घेऊन आरोपीने कोठडिया यांच्या बँक खात्यातून एक लाख 33 हजार 200 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली.

घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.