Hinjawadi : क्रेडिट कार्डची माहिती घेऊन 1 लाख 10 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रेडिट कार्डची माहिती घेऊन नवीन पिन जनरेट करून देण्याच्या बहाण्याने एकाची 1 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 28 मार्च 2019 रोजी पुनावळे येथे घडली. पाच महिन्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुहास विलास चव्हाण (वय 34, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 8750216573 या मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने सुहास यांना 8750216573 या मोबाईल क्रमांकावरून फोन केला. फोनवरून सुहास यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डची सर्व माहिती घेतली. सुहास यांना क्रेडिट कार्डचा नवीन पिन जनरेट करून देण्याचा बहाण्याने त्यांच्या कार्डकरून 1 लाख 10 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.