Hinjawadi : मारुंजीत रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह आढळला. ही घटना आज, बुधवारी (दि. 4) सकाळी मारुंजी येथील कोलते पाटील सोसायटीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील कोलते-पाटील सोसायटी जवळ असलेल्या मोकळ्या मैदानात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.

तरुणाच्या मृतदेहाजवळ बिअरच्या बाटल्या आणि दुचाकी आढळली आहे. रात्री दारू प्यायल्यानंतर भांडण होऊन खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. तसेच खून झालेला तरुण कोल्हापूर येथील असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.