Hinjawadi : डंपरची दुचाकीला धडक; डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक(Hinjawadi) दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 13) सकाळी सुसगाव येथे घडली.

अक्षय अशोक भोईने (वय 24, रा. थेरगाव) असे मृत्यू(Hinjawadi) झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रमेश दामोदर भोईने (वय 49) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीमंत सदाशिव भांगे (वय 43, रा. धायरी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehuroad : क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ अक्षय भोईने हा लवळे येथून दुचाकीवरून घरी येत होता. सुसगाव ग्रामपंचायत समोर आल्यानंतर अक्षय याच्या दुचाकीला आरोपीच्या ताब्यातील डंपरने धडक दिली.

यामध्ये अक्षय हा डंपरखाली चिरडला गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.