Dehuroad : क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – क्रेनला लाऊन जॉब पार्ट कंपनीच्या गोडाऊन (Dehuroad)मधून बाहेर घेत असताना विजेत्या तारेला जॉब पार्टचा स्पर्श झाला. त्यावेळी जॉब पार्टला पकडलेल्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 4 मार्च रोजी दुपारी तळवडे येथील अतुल इंडस्ट्रीज प्रिमायसेस मध्ये घडली.

जीलाजित प्रेमबहादूर गौतम (वय 23) असे मृत्यू झालेल्या (Dehuroad)कामगाराचे नाव आहे. क्रेन चालक आलोक कुमार महतो (वय 33, रा. तळवडे, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan : ग्लास फोडण्याचा जाब विचारल्याने मित्राला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल इंडस्ट्रीजच्या प्रिमायसेसमध्ये हेमंत इंडस्ट्रीज येथे सात ते आठ टन वजनाचा चौकोनी आकाराचा ब्रॉयलर प्रेशर पार्ट स्टोरेज प्लेस गोडाऊन मधून बाहेर काढून गाडीमध्ये लोडिंग करत असताना क्रेन चालकाच्या हलगर्जीपणामुळे पार्टचा विजेच्या तारांना धक्का लागला.

तारांमधील विजपुरवठा जॉबमध्ये उतरला. जीलाजित हा जॉब पार्ट धरून उभा असल्याने त्याला विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.