Hinjawadi : हिंजवडीत गोदामाला आग

एमपीसी न्यूज – हिंजवडीमध्ये एका गोदामाला आग लागली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी घडली. अग्निशमन विभागाला अद्याप घटनेची माहिती मिळाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे विठ्ठल लॉन्सच्या बाजूला असलेल्या एका गोदामाला आज दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग मोठ्या प्रमाणात लागल्याने धुराचे लोट आकाशात पसरले आहेत. आयटी पार्कवर धुराचे सावट पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.