Hinjawadi : घरात घुसून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – घरात घुसून एका तरुणाने (Hinjawadi) महिलेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 22) सकाळी बोडकेवाडी माण येथे घडली.

नितेश जाधव (वय 26, रा. बोडकेवाडी रोड, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad Bye Election : आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे – राजेश देशमुख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या घरी असताना फिर्यादीच्या कंपनीत काम करणारा आरोपी जाधव फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीकडे पिण्यासाठी पाणी (Hinjawadi) मागितले. त्याला पाणी आणण्यासाठी फिर्यादी घरात गेल्या असता आरोपी देखील फिर्यादीच्या मागे घरात आला. त्याने फिर्यादी सोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.