Hinjawadi : चिखल व खोदकामाने घेतला दुचाकीस्वाराचा जीव

एमपीसी न्यूज : रस्ता खोदल्याने रस्त्यावर चिखल झाला (Hinjawadi) होता. याच चिखलात घसरून पडलेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली. यातच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.21) हिंजवडी येथील मेट्रो ब्रीजखाली हैद्राबादी हाऊस जवळ झाला.

निलेश राजेंद्र पाटील (वय 33रा. माणगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकऱणी त्यांचा मित्र दिगंबर अनिवाश पाटील (वय 23 रा.हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी कार चालक महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निलेश यांच्यासह दुचाकीवरून जात होते. यावेळी रस्ता खोदला असल्याने रस्त्यावर चिखल झाला होता. या चिखलात निलेश यांची दुचाकी घसरली व दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यावेळी संबंधित महिला तिच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने घेऊन आली व तिने निलेश यांना धडक दिली.

PCMC : मानधनावरील कर्मचारी सेवेत कायम

यात निलेश हे गंभीर जखमी झाले व त्यांचा या अपघातात (Hinjawadi) मृत्यू झाला. यावरून महिलेवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल झाला असला तरी खोदकाम देखील तेवढेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे…यावेळी नागरिकांनी देखील वाहने जपून चालवावीत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.