Hinjawadi News: कंपनीतील नोकरी फिक्स करण्याचे सांगत तरुणाची अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  – कंपनीतील नोकरी (Hinjawadi News) फिक्स करण्याचे सांगत वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप कुरिअर करण्यासाठी दोन लाख 40 हजार रुपये घेऊन तरुणाची फसवणूक केली. ही घटना 4 मे ते 9 मे 2022 दरम्याम मुळशी येथे घडली.

याप्रकरणी उपेंद्र शिरिष कुलकर्णी (वय 26, रा. पांढरेवस्ती, पुनावळे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरज सिंचना (एचआर डिपार्टमेंट सेलोनिसे टेक्नॉलीजिस कंपनी, बंगळुरु कर्नाटक) आणि मॅनेजेर अभिदिप दासगुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादी उपेंद्र याला तुझा रिज्युम सिल्केट झाला आहे. कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे. पण, एका पदासाठी अनेक उमेदवार आलेले आहेत. जर त्यातून तुझी निवड फिक्स करायची असेल. तर, त्यासाठी आमची फी द्यावी लागेल. तसेच, कंपनीचे शेअर्स घ्यावे लागतील. वर्क फ्रॉम होम त्यासाठी लागणारे लॅपटॉप द्यावे लागतील. ते कुरिअर करण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगत फिर्यादी उपेंद्र याचा विश्वास संपादन केला. त्याची 2 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केली. फिर्यादीचे पैसे परत न करता आरोपींनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी (Hinjawadi News) पोलीस तपास करत आहेत.

Yerwada : पुण्यात येरवड्यातून सराईत गुन्हेगाराकडून आठ लाखाचे एम.डी. जप्त

सांगवीत डिलरशीप देण्याच्या आमिषाने 45 हजारांची फसवणूक

हर्बल मार्ट कंपनीची डिलरशिप व प्रोडक्ट देतो. कमिशन मिळवून देतो असे सांगत विश्वास संपादन केला. डिलरशिपसाठी 30 हजार व स्टॉक घेण्यासाठी 15 हजार असे 45 हजार रुपये ऑनलाईन घेतले. पण, स्टॉक न देता फसवणूक केली. याप्रकरणी आनंदकुमार लक्ष्मण मसणे (वय 52, रा. किर्तीनर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी अभिषेक तिवारी, अमित पवार, आशिष पवार (रा. उरळीदेवाची, पुणे) आणि नितु जैन यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.