Sangavi News: मुलीचा विनयभंग केल्याचा जाब विचारल्याने आरोपीने दिली महिलेला धमकी

एमपीसी न्यूज – मुलीचा विनयभंग (Sangavi News) केल्याचा जाब विचारल्याने एका तरुणाने ‘तुला काय करायचे ते कर, मी माझे बघून घेईल, तुला पण जगून देणार नाही’ अशी धमकी मुलीच्या आईला दिली. ही घटना शुक्रवारी (दि.3 जून) पिंपळेनिलख येथे घडली.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुहास राजकुमार शेलार (वय 20, रा. पिंपळेनिलख) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आले.

फिर्यादी यांची 15 वर्षांची मुलगी भावाला क्लासला सोडून राहत्या घरी येत होती. त्यांच्याच सोसायटीत राहणारा आरोपी सुहास पार्किंगमध्ये थांबला होता. आरोपीने फिर्यादीच्या मुलीला ‘ए बावळट थांबना’ असे बोलून तिचा हात धरुन मनास लज्जा उत्पन्न केली. याबाबत कोणास काही सांगितले. तर, आई-वडिलांना मारेन अशी धमकी दिली. झालेल्या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी आरोपी सुहास याच्याकडे विचारणा केली असता, त्यावेळी आरोपी सुहासने ‘तुला काय करायचे ते कर, मी माझे बघून घेईल, तुला पण जगून देणार नाही’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस अधिक (Sangavi News) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.