Bhosari News: ‘तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का’? असे म्हणत महिलेला मारहाण करत केला विनयभंग

एमपीसी न्यूज –  ‘तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का’? असे म्हणत (Bhosari News) दोघांनी एका महिलेला मारहाण केली. अश्लिल बोलून महिलेची छेड काढली, विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि.2 जून) रोजी पावणेदहाच्या सुमारास नाशिक-पुणे हायवे येथे घडली.

kalewadi Rape Case : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय यादव कानडे (वय 26, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि सागर मारुती हिवरे (वय 21, रा. दिघीरोड, संत तुकारामनगर) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

फिर्यादी नाशिक-पुणे हायवेवरुन (Bhosari News) जात असताना आरोपी तिथे आले. ‘तुला कोठे जायचे आहे, मी सोडू का’? असे फिर्यादीला विचारले. त्यावर नको दादा म्हणत फिर्यादी दुस-या रिक्षाकडे गेल्या. पुन्हा तिथे जात आरोपींनी ‘मी सोडू का’? असे फिर्यादीला म्हटले. त्यावर फिर्यादी नको म्हणाल्या. तरी, देखील आरोपी ऐकत नव्हते. त्यामुळे फिर्यादीने आरोपीला मारण्यासाठी हात उगरला असता आरोपीने फिर्यादीचा हात जोरात दाबला. त्यामुळे फिर्यादीच्या हाताला खरचटले. त्यानंतर फिर्यादीला लाथ मारली. घाणघाण अश्लिल शब्द बोलून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न  केली. तसेच फिर्यादीच्या भावाने हात सोडण्याचा प्रयत्न केला, तर, आरोपींनी भावाला सुद्धा डोक्यात दगड मारुन दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.