kalewadi Rape Case : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – ‘आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे’ असे बोलत, लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  संबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहून तिला मुलगा झाला व त्याचा मृत्यूही झाला. ही घटना ऑगस्ट ते ऑक्टोबर 2021 दरम्यान काळेवाडी (kalewadi Rape Case) येथे घडली.

याप्रकरणी 15 वर्षीय मुलीच्या 42 वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पवन उर्फ गुरु कैलास ओव्हाळ (वय 19, थेरगाव, मूळगाव बीड) याच्यावर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पवन हा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणातील पूर्वीच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.

Hinjawadi News: फेसबुकवरील तरुणीची मैत्री ज्येष्ठाला पडली महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 15 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी जवळीक साधली.  ‘आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे’ असे बोलून वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिला मुल झाले. त्या मुलाचा मुत्यूही झाला. वाकड पोलीस या घटनेचा अधिक तपास (kalewadi Rape Case) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.