River Plogathon : ‘रिव्हर प्लोगेथॉन’ मोहिमेत 3 टन कचरा संकलित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (River Plogathon) वतीने प्लास्टिक मुक्ती अभियाना अंतर्गत ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील चिखली व मोशी येथील इंद्रायणी नदीच्या परिसरात आयोजित ‘रिव्हर प्लोगेथॉन’ मोहिममध्ये सुमारे चारशे पन्नास शालेय विद्यार्थी, शिक्षक, सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग घेऊन सुमारे 3 टन कचरा संकलित केला.

चिखली येथील भैरवनाथ मंदिर परिसर लगत असणाऱ्या इंद्रायणी नदीच्या किनारा व परिसरात प्लास्टिक मुक्ती अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच, प्लास्टिक वापरणार नसल्याबाबत व पर्यावरण संवर्धनासाठी शपथ घेतली. तसेच, मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी लगत असणाऱ्या नदी किनारच्या परिसरातही प्लोगेथोन मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये माजी महापौर राहुल जाधव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, चिखली सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगडे, दिनेश यादव, गणेश मोरे, बी. बी. कांबळे, वैभव कांचनगौडार, एस. एन. बी. पी. शाळेचे सुमारे 300 विद्यार्थी, सिटी प्राइड शाळेचे सुमारे 25 शिक्षक, श्रीमती भाल्ला, सूजा राजेश व मोशी परिसरातील विविध सोसायटीचे सभासद, ज्येष्ठ नागरिक, महापालिका अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

River Plogathon : प्लास्टिकमुळे नदीरुपी मातेचे अतोनात नुकसान – आयुक्त राजेश पाटील

तसेच, नागरिकांमध्ये प्लास्टिक मुक्त अभियानाची (River Plogathon) जनजागृती करण्यासाठी सुमारे 300 शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.