Hinjawadi News : दुकानातून 44 हजारांचे लेडीज ड्रेस मटेरियल चोरीला

एमपीसी न्यूज – लेडीज कपड्यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 44 हजार रुपये किमतीचे लेडीज ड्रेस मटेरियल आणि ड्रेस चोरी करून नेले. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी दहा वाजता विनोदे नगर, वाकड येथे उघडकीस आली.

मनुप्रिया अनुरथ मलिक (वय 31, रा. विनोदेनगर, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मलिक यांचे विनोदे वस्ती इनसिग्रीया सोसायटीमध्ये लेडीज कपड्यांचे दुकान आहे. त्यांनी त्यांचे दुकान शनिवारी सायंकाळी सहा वाजता कुलूप लाऊन बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानातून 44 हजार रुपये किमतीचे लेडीज ड्रेस आणि ड्रेस मटेरियल चोरून नेले. रविवारी सकाळी फिर्यादी दुकान उघडण्यासाठी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.