Hinjawadi Police : मुलाचे अपहरण करून 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना अवघ्या सहा तासात अटक

एमपीसी न्यूज : हिंजवडी पोलिसांनी (Hinjawadi Police) अपहरण झालेल्या मुलाची सुटका करत 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना अटक केल्याची यशस्वी कामगिरी केली. हि कामगिरी अवघ्या सहा तासात पूर्ण केली .

एका 15 वर्षीय मुलाचे हिंजवडी फेज 2 येथून अपहरण झाले. याबाबत अपहरण झालेल्या मुलाची आई रेखा कश्यप (वय 35) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या नंतर शोधमोहिमेला सुरुवात झाली. अवघ्या सहा तासात हिंजवडी गुन्हा शाखेने लक्ष्मण डोंगरे (वय 22 वर्षे), ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22 वर्षे), लखन चव्हाण (वय 26 वर्ष, सर्व रा.अश्विनीपूर तांडा, गाव वरुड, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ) या तिघांसहित दोन विधिसंघर्षित बालकांना अटक रंगेहात अटक केली. आणि अपहरण झालेल्या मुलाची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका करून घरच्यांना सुपूर्द केले.

सविस्तर माहिती अशी, कि फिर्यादीचा 15 वर्षीय मुलगा सनी कश्यप हा आयसीआयसीआय बँक जवळील स्वराज पेट्रोल पंप समोर फेज 2 मध्ये पाणीपुरीची हाथगाडी घेऊन 2 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास घरी येत असताना अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले. हे अपहरण खंडणी मागण्याच्या उद्देशाने करण्यात आले. फिर्यादीचा पती शंकर कश्यप यांना फोन करून 20 लाख रुपयांची आरोपींनी खंडणीची मागितली. खंडणी न दिल्यास तुमच्या मुलास जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या (Hinjawadi Police) मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास सुरु करण्यात आला. अपहरण केलेल्या मुलाच्या वडिलांना म्हणजेच शंकर कश्यप यांना ज्या मोबाईल क्रमांकावरून खंडणीचा फोन आला होता, त्या नंबरचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूला असणाऱ्या एकूण 18 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक करून संशयित इसम हे मारुती झेंडा कार क्र. एम एच 04 ए एक्स 4238 या गाडीतून मुलाला घेऊन अहमदनगर रोडने जात असल्याचे समोर आले. तसेच, आरोपी सशस्त्र असल्याची देखील खात्रीशीर बातमी मिळाली.

Chinchwad Crime : सहा जणांनी केली सप्लायरची तब्बल 23.40 लाख रुपयांची फसवणूक

मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके निर्माण करून तात्काळ एका पथकाने अहमदनगर रोडने जाऊन शोध घेतला असता शिक्रापूर जवळील मलठण फाट्यावर एका काळ्या रंगाची मारुती झेन गाडी थांबलेली दिसली व गाडीत काही इसम बसलेले दिसले.
ती गुन्ह्यातीलच गाडी असल्याची खात्री झाले. त्यानंतर पोलीस अधिकारी यांनी पोलीस अंमलदार यांना आरोपी हे सशस्त्र असून त्यांच्या ताब्यातून मुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी व आरोपी यांना ताब्यात घेण्यासाठी मार्गदर्शन केले.

त्यानंतर टीमने वेषांतर करून एकाच वेळी गाडीच्या चारही दरवाज्यावर झडप टाकून आरोपींना ताब्यात घेतले. गाडीची तपासणी करता, आतमध्ये 6 इसम असून त्यामध्ये अपहरण झालेला सनी कश्यप व इतर 2 विधिसंघर्षित बालके सापडली. सर्वांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्यांच्या ताब्यातून एक लोंखंडी कोयता, एक लोंखंडी तलवार, 5 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन व मारुती झेंडा कार असा एकूण 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरोधात भा. द. वि. कलम 364(अ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अन्वये गुन्हा दाखल (Hinjawadi Police) करण्यात आला आहे.

अधिक तपासात आरोपींना त्यांच्याकडील फोनबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, त्यांनी 1 जूनला रात्री दुचाकी वाहनावरून ट्रिपल सीट जाऊन टाटा जॉन्शन कंपनी समोर हिंजवडी फेज 2 येथून एका पादचाऱ्यास अडवून एकाने त्याचे हात पकडून व दुसऱ्याने त्याच्या खिशातील मोबाईल फोन हिसकावून मोबाईल चोरला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तसेच 29 जून रोजी फिर्यादी मनीष राठोड (वय 14 रा. अश्विनपूर, पुसद, जिल्हा यवतमाळ) हे सकाळी घरासमोर उभे असताना आरोपी लखन चव्हाण, एक साथीदार व दोन विधिसंघर्षित बालके यांनी फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या शर्टच्या खिशातील रोख 700 रुपये तसेच हातातील घड्याळ जबरदस्तीने चोरला. याबाबतही पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तीनही आरोपींचे रेकॉर्ड तपासले असता त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. लखन चव्हाणच्या विरोधात आर्नी, पुसद व हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. लक्ष्मण डोंगरेच्या विरोधात पुसद व हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. ज्ञानेश्वर चव्हाणच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.