Hinjawadi : कंस्ट्रक्शन साइटवरून पावणे दहा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – विलास जवडेकर इकोसेल्टर कन्स्ट्रक्शनच्या साइटवरून पॉली कॅब वायर, ग्रीनलँड कंपनीचे एमसीबी, आरसीसीबी असे एकूण नऊ लाख 88 हजार 702 रुपयांचे मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी नऊच्या सुमारास हिंजवडी येथे उघडकीस आली.

नितीन भाऊराव तरंगे (वय 40, रा. वारजे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास जवडेकर इकोसेल्टर कन्स्ट्रक्शनची हिंजवडी फेस 2 येथे बांधकाम साईट सुरू आहे. साइटवर ठेवलेले पॉलीकॅब वायर, ग्रीनलँड कंपनीचे एमसीबी व आरसीसीबी असे मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

हा प्रकार शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.