Hinjawadi : भरधाव कारच्या धडकेत स्विगीचा डिलिव्हरी बॉय जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये स्विगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कस्तुरी चौक, हिंजवडी येथे घडला.

पांडुरंग प्रभाकर कोळी (वय 32, रा. काळेवाडी) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 12/पीझेड 3995 या कारवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोळी हे स्विगी कंपनीत खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करण्याचे काम करतात. 23 मार्च रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ते हिंजवडी येथील कस्तुरी चौकात थांबले होते. त्यावेळी आरोपी कार घेऊन भरधाव वेगात हिंजवडीकडून वाकडकडे जात असताना कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.