Hinjawadi : किरकोळ कारणावरून दोघांना बेदम मारहाण; एकावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – पाच जणांनी मिळून किरकोळ (Hinjawadi ) कारणावरून दोघांना बेदम मारहाण केली. त्यातील एकावर जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास जयराम नगर, हिंजवडी येथे घडली.

अमृत पासवान, राहुल पासवान, मनोज कुमार, राजू पाल, सोनू (सर्व रा. जयरामनगर, हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अमृत, राहुल, मनोज, राजू यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मोहम्मद हारून अन्सारी (वय 32, रा. जयरामनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नातेवाईक मोहम्मद तोहीद अली उल्ला अन्सारी यांच्यावर आरोपींनी खुनी हल्ला केला आहे.

Thergaon : दवाखान्याचे बिल भरण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीकडून रुग्णाची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी आरोपी राहुल, मनोज आणि राहू हे लघुशंका करीत होते. (Hinjawadi ) त्यामुळे फिर्यादी यांना आरोपींना विरोध केला. त्या कारणावरून सर्व आरोपींनी एकत्र येत फिर्यादीस लाकडाने बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे नातेवाईक मोहम्मद तोहीद अलीउल्ला अन्सारी यांना देखील लाकडाने मारून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.