Honda : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची घोडदौड कायम

एमपीसी न्यूज : प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात असलेल्या होंडा मोटरसायकलने ऑगस्ट 2022 या महिन्यात 4 लाख 62 हजार 523 युनीटची विक्रमी विक्री केली आहे.(Honda) विक्री झालेल्या युनीटची आकडेवारी होंडा कंपनीकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आणि सणासुदीच्या निमित्ताने वितरकांमध्ये असलेल्या उत्साहाच्या जोरावर कंपनीच्या एकूण डिस्पॅचेसमध्ये ऑगस्ट महिन्यात 7 टक्के वाढ होऊन विक्री 4 लाख 62 हजार 523 युनिटवर  पोहचली आहे. यामध्ये देशांतर्गत विक्री ही 4 लाख 23 हजार 216 एवढी आहे (Honda) तर निर्यात 39 हजार 307 एवढी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट 2021 मध्ये 4 लाख 31 हजार 594 युनिट्सची विक्री झाली होती. त्यात देशांतर्गत 4 लाख 1 हजार 480 तर निर्यात 30 हजार 114 झाली होती.

Illegal Power : पिंपरी-चिंचवडमध्ये महावितरणकडून बेकायदेशीरपणे विजेचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई होणार

बाजारपेठेत होत असलेल्या प्रगतीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘गेल्या महिन्याच्या तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत बाजारपेठेची कामगिरी सुधारत आहे(Honda) विविध प्रकारची उत्पादने लाँच करत आम्ही सणांचे स्वागत करत असून वेगवेगळ्या टचपॉइंट्समध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आकर्षक वित्तपुरवठा योजनांमुळे उत्साह द्विगुणित होईल याची आम्हाला खात्री वाटते.’

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.